नाव नोंदणीची कार्यपध्दती, नियम व अटी....
नावनोंदणीसाठी संस्थेची कार्यपध्दती, नियम व अटी :
1) संस्थेचे कार्य महाराष्ट्रियन ब्राह्मण शाखांतील (कोकणस्थ, देशस्थ, कर्हाडे व देवरुखे)
वधू-वरांसाठीच मर्यादीत राहील.
2) अनुरुप व योग्य स्थळांचे पत्ते व माहीती मिळण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
वराची / वधूची नोंदणी रु.345/- भरुन करता येईल. ही नोंदणी 2 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. त्यानंतर त्यावेळीची रिन्युअल फी भरुन मेंबरशीप् 'रिन्यु' करता येईल.
3) 'इंटरनेट सुविधा मेंबरशीप' साठी रु.155/- इतके शुल्क वेगळे भरावे लागेल. 'इंटरनेट सुविधा मेंबरशीप' असणार्यांसाठी, सभासदांना एक Code नं. देण्यात येईल. इंटरनेटवरील स्थळांची माहीती घेताना ह्या Code नं. चा संदर्भ संस्थेकडे देणे आवश्यक राहील.
'इंटरनेट सुविधा मेंबरशीप' साठीचे रु.155/- इतके शुल्क नोंदणीच्या दिवशी न भरता काही काळानंतर वेगळे भरल्यास मेंबरशीपच्या मूळ कालावधीमध्ये फरक पडणार नाही.
4) दिनांक 1/Jan/2008 पूर्वी सभासदत्व घेतलेल्यांना 'इंटरनेट सुविधा मेंबरशीप' घ्यावयाची झाल्यास वर दर्शविलेले इंटरनेट सुविधा मेंबरशीप' साठीचे रु.155/- एवजी रु.250/- इतके शुल्क वेगळे भरावे लागेल.
5) नोंदणीफॉर्म बाहेरगावी पाठवावयाचा झाल्यास फॉर्म पाठविण्याचा पोस्टेजखर्च वेगळा द्यावा लागेल. फोटोसोबत फॉर्ममधील संपूर्ण माहीती भरुन दिल्यानंतरच सभासदांस स्थळे घेता येतील. अपूर्ण भरलेल्या फॉर्मचा विचार केला जाणार नाही.
6) वेळोवेळी टपालखर्च वेगळा दिल्यास किंवा स्वत:चा पूर्ण पत्ता लिहीलेले व पोस्टेजचे तिकीट लावलेले रिकामे पाकीट संस्थेकडे पाठविल्यास किंवा कुरिअरचे योग्य ते शुल्क भरल्यास, योग्य व अनुरुप स्थळांची यादी घरपोहोच मिळविण्याची सोय देखिल सभासदांस उपलब्ध राहील. अर्थांत या प्रक्रीयेंत पोस्टाकडून किंवा कुरिअरकडून होणारा उशीर ग्रुहित धरावा लागेल. साधारणत: दर दोन महिन्यांनी, तसेच स्थळे उपलब्ध होत असल्यासच ती टपालाद्वारे सभासदांना पाठविली जातील.
7) प्रत्येक सभासदांस रिसिटद्वारे नोंदणी क्रमांक देण्यांत येईल. प्रत्येकवेळी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क साधताना रिसिट आणणे बंधनकारक राहील. रिसिटशिवाय स्थळांची माहीती मिळणार नाही. फोनवरुन स्थळांची माहीती घेताना नोंदणीक्रमांक सांगितल्याशिवाय स्थळांची माहीती मिळणार नाही.
8) प्रत्येक सभासदाने उपवर/उपवधूचा फोटो देणे आवश्यक आहे. लग्न ठरल्यानंतर पत्र किंवा फोनद्वारे संस्थेकडे ताबडतोब कळवून फोटो, सभासदांस नोंदणी क्रमांकाचे कार्ड/स्लीप संस्थेकडे जमा करुन परत मिळेल. अर्थात कार्ड/स्लीप देऊन फोटो घेऊन जाणे ही सभासदांची जबाबदारी राहील. संस्थेकडून पोस्ट किंवा कुरिअरद्वारे हा फोटो घरपोहोच पाठविला जाणार नाही. लग्न जमल्याचे/ झाल्याचे कळविल्यानंतर सहा महिन्यांचे आत फोटो न नेल्यास तो परत करणे संस्थेवर बंधनकारक राहणार नाही.
9) व्यंग असणार्या वधू-वरांना रु.150/- भरुन नाममात्र सभासदत्व घेता येईल. नाममात्र सभासदांस स्थळे घेताना प्रत्येक स्थळामागे रु. 10/- इतका वेगळा आकार द्यावा लागेल. अर्थात नाममात्र सभासदत्वाची ही सुविधा फक्त व्यंग असलेल्या वधू-वरांसाठीच मर्यादीत राहील.
10) आपण घेऊ इच्छीत असलेल्या स्थळांच्या अपेक्षांचा विचार करणेही गरजेचे आहे. या अपेक्षा मॅच होत असलेली स्थळेच आपणास घेता येतील. अर्थात एकावेळी 10 ते 12 पेक्षा जास्त स्थळे घेता येणार नाहीत.
11) फ्रेश स्थळांची सम्पर्क माहिती पुनर्विवाहेछुकांना घेता येणार नाही. व संस्थेकडून तशी दिलीही जाणार नाही. प्रथमवर / प्रथमवधू यांच्या अपेक्षांमध्ये घटस्फोटित / विधवा / विधूर स्थळे चालतील असा उल्लेख नसतो. त्यामुळे पुनर्विवाहेछुक सभासदांना पुनर्विवाहेछुक स्थळेच घेता येतील. त्यामुळे अशा स्थळांनी फ्रेश स्थळांचे पत्ते , फोन नंबर्स , मोबाइल नंबर्स किंवा इ-मेल आय. डी. मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारे गळ घालू नये.
सर्वांना सोयीचे व्हावे या दृष्टीने र्फॉर्म पूर्णपणे मराठीमध्ये भरलेला असावा. अपूर्ण भरलेल्या फॉर्मचा, तसेच सोबत फोटो पाठविलेला नसलेल्या फॉर्मचा विचार केला जाणार नाही. फॉर्मसोबत सभासदशुल्काचा डी. डी. पाठवावा. किंवा या रकमेची मनीऑर्डर करावी.
बाहेरगावच्या चेकवर कमिशन द्यावे लागत असल्याने चेकने रक्कम पाठवू नये. .
डी. डी. किंवा मनीऑर्डर ' सौ. शशिकला फडके ' ( Sou. Shashikala Phadke ) या नावानेच पाठवावी.