सुयश विषयी थोडेसे.......
आज आम्हास सांगावयास अत्यंत आनंद वाटतो आहे की, सहा वर्षांपूर्वी याच दिवसांत आमच्या संस्थेने मूहूर्तमेढ रोवून ब्राह्मण चतु:शाखीय वधू-वरांसाठी कार्यप्रारंभ केला. आणि बघता बघता संस्था सहा वर्षांची झाली. प्रत्येक आई-वडीलांना आपलं मूल फक्त मोठं व्हावसच वाटतम असं नाही तर ते संस्कारित असावं, बौद्धीक दृष्ट्या परिपक्व (मॅच्युअर्ड) असावं असंही वाटत असतं. आमचं हे संस्थारुपी अपत्यही याला निश्चितच अपवाद नाही. इतर संस्थांसारखं 'फॉर्म भरा, पैसे भरा, व त्यानंतरच स्थळे पहा!' असे न म्हणता, 'प्रथम योग्य व अनुरुप स्थळे असल्याची खात्री करून घ्या आणि मगच फॉर्म व पैसे भरुन नोंदणी करा!' अशी वृत्ती बाळगून, समाजाभिमुख काम करण्याचा वसा घेतलेली, आमची एकमेव संस्था पुण्यामध्ये असल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. सभासदांना आपुलकीनं विचारणं, त्यांची आपलेपणानं चौकशी करुन त्यांना तशी सेवा देणं यांत आमची संस्था कुठेच मागे नाही. संस्थेमध्ये येणार्या प्रत्येक सभासदाला घरच्यासारखी वागणूक देऊन त्याचं भलं जाणणं ही तर आमच्या संस्थेची खासीयत आहे. ' आपणच काय ते वधू-वरांचे हित जाणणारे आहोत' असे भासवणार्या, शेकड्यांमध्ये/ हजारांमध्ये अशी दरवर्षी भरपूर फी आकारुन आणि कमर्शिअल वृत्तीने, फक्त पैसा मिळवणे हे ध्येय बाळगणार्या, आणि सभासदांसाठी फार काही मोठे न करता 'मोठं नांव' झालेल्या वधू-वर संस्थांची, निदान या पुण्यनगरीत तरी मुळीच वानवा नाही.
खरे तर 'लग्न जमविण्यासाठीचे प्रयत्न ' हा व्यवसायाचा विषयच असू शकत नाही. अर्थात याचा अर्थ असाही नाही की हे सगळं मोफत करावं! कारण, आम्हासंच आलेल्या अनुभवांवरुन, एक तर कोणतीही गोष्ट मोफत मिळाल्यास 'त्या गोष्टीची किंमत उरत नाही' आणि दुसरे म्हणजे आपण या गोष्टींसाठी देत असलेला वेळ, सभासदांना उपलब्ध करुन देत असलेल्या सेवा, तसेच त्या सेवांसाठी संस्थेला वेळोवेळी प्रत्यक्ष करावा लागणारा खर्च हा त्या त्या सभासदांकडून / व्यक्तींकडून घेण्यात गैर असे काहीच नाही. अर्थात आमचा हा दृष्टीकोन आम्हास वेळोवेळी आलेल्या अनुभवांवर आधारित म्हणजेच 'अनुभवसिद्ध' आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर आमची संस्था अव्वाच्या सव्वा पैसे न घेता, योग्य त्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त सेवा देणारी अशी समाजाचे हित जपणारी पुण्यातील एकमेव संस्था आहे.
- Login to post comments